शीतपित्त ( Urticaria )

ज्या रोगामध्ये सर्वांगावर गांधी उठतात , उत्सेध येतो , दाह - कंडू व आरक्तवर्णता असते त्या व्याधीला शीतपित्त असे म्हणतात.

पित्ताबरोबर शीतगुणात्मक अशा कफ व वायु यांचा अनुबंध असतो.

संप्राप्ति

शीतमारूतसंस्पर्शात्प्रदूष्टौ कफमारूतौ ।
पित्तेन सह संभूय बहिरन्तर्विसर्पतः ।।
(मा.नि./शीतपित्त/१)

*गार वारा लागल्याने किंवा वेगविधारणादि इतर कारणाने कफ व वात प्रकोप होतो. 
                          ||
*हा प्रकुपित वायु व कफ स्वकारणांनी प्रकुपित झालेल्या पित्ताशी संसर्ग करून विमार्गग होऊन त्वचेवर मंडलोत्पत्ति करतो. यासच शीतपित्त म्हटले जाते.

पूर्वरूपे

पिपासारूचिहृल्लासदेहेसादांगगौरवम् |
रक्तलोचनता तेषां पूर्वरूपस्य लक्षणम् || 
मा.नि./शीतपित्त/२)

लक्षणे


चिकित्सा

*मोहरीच्या तेलाने स्नेहन करून नंतर गरम पाण्याने स्वेदन करणे.

*शोधन आवश्यक.

*वमनासाठी पटोले , अरिष्टक , निंब , वा वासा यांचा उपयोग करावा.
*मदन , वचा , यष्टीमधु यांचे सहाय्यानेही वमन देता येते.किंवा जलाने वमन करवावे.

*ज्या रूग्णांमध्ये वमन देणे शक्य नसते , त्यामध्ये मृदू विरेचन वापरावे.
*विरेचनासाठी निशोत्तर , त्रिफळा , गंधर्व हरितकी , आरग्वध यासारखी मृदू विरेचक द्रव्य वापरावीत.

*शमन औषधी मध्ये उष्ण , तीक्ष्ण , आमपाचक , वातानुलोमक औषधांमुळे वातकफाचा प्रशम होतो.त्यामुळेच विमार्गग झालेल्या पित्तासही अनुलोम गती प्राप्त होते.
*त्रिकटु
*हरिद्राखंड
*समीरपन्नगरस

*कंडू कमी करण्यासाठी खाण्याच्या सोड्याचे पाणी तयार करून सर्वांगावर चोपडले जाते.
*आमसुलाचे पाणीही याप्रकारे लेपनासाठी व पानासाठी ही वापरतात.
*कंडू प्रशमनासाठी वंगभस्म किंवा त्रिवंग भस्म हे सद्य:फलदायी म्हणून उपयुक्त.

*सूतशेखर , आरोग्यवर्धिनी , गंधक रसायन , चतुर्भुज रस शीतपित्तावर उपयुक्त.
*झेंडूच्या पानांचा रस हा बाह्य लेपनासाठी तसेच अभ्यंतर प्रयोगासाठीही सद्यफलदायी ठरतो.

पथ्यापथ्य

*जुने तांदूळ , कुलत्थ यूष , कारल्याची भाजी विशेष पथ्यकर समजली जाते ‌.

*गुरू , अम्ल , विदाही अन्य , शीतजलाने स्नान , गार वारा व आतप यांचे सेवन करणे अपथ्यकर आहे.

Comments