शिरःशूल

हेतू

संधारणाद्दिवास्वप्नाद्रात्रौ जागरणान्मदात् ।
उच्चैर्भाष्यादवश्यायात् प्राग्वातादतिमैथुनात् ।।
गंधादसात्म्यादाघाताद्रजोधूमहिमातपात् ।
गुर्वम्लहरितादानादति शीतांबुसेवनात् ।।
शिरोअभिघाताद् दुष्टामाद्रोदनाब्दाष्पनिग्रहात् ।
मेघागमान्मनस्तापाद्देशकालविपर्ययात् ।। (च.सू.१७/८-१०)

संप्राप्ति

वातादयः प्रकुप्यन्ति शिरस्यस्त्रं च दुष्यति ।
ततः शिरसि जायन्ते रोगाः विविधलक्षणाः ।। (च.सू.१७/११)

वातज शिरःशूूूल लक्षणे

* वातज शिरोरोगात काहीही विशेष कारण नसताना आकस्मात तीव्र स्वरूपाचा शूल सुरु होतो.

* शूल रात्री अधिक असतो.

* शंखप्रदेशी सुई टोचल्याप्रमाणे वेदना असते.

* मानेमध्ये तोडल्याप्रमाणे वेदना उत्पन्न होते.

* भुवयांच्यामध्ये व मस्तकात वायु फिरल्याप्रमाणे वेदना

* शिरोभागातील सिरांचे ठिकाणी स्फुरण 

* हनुस्तंभ व मन्याग्रह

* डोळ्यांना प्रकाश सहन होईनासा होतो

* नासास्त्रावही अधिक असतो

उपशम

तैलमर्दन , स्नेहन , बंधन , स्वेदन

चिकित्सा

*वायु -रूक्ष , लघु गुणांनी वृध्दी - पित्ताचा अनुबंध - घृताचा उपयोग स्नेहनासाठी

*वायु - लघु , शीत गुणांनी वृध्दी - कफाचा अनुबंध - तेलाचा उपयोग स्नेहनासाठी

*वरूणादि गणातील औषधांनी सिद्ध घृत - नस्य
*मधुरादि गणातील औषधांनी सिद्ध घृत - नस्य

* पान , अभ्यंग , नस्य , बस्ति , परिषेक या सर्वांसाठी त्रिवृत् वा बलातैलाचा उपयोग

*कर्णपूरण

*शिरोबस्ती

*वातविध्वंस , सर्पगंधा उपयुक्त

*रक्तमोक्षण निषिद्ध

# पित्तज शिरःशूल लक्षणे

* सर्व शिरःप्रदेश पेटलेल्या निखाऱ्याप्रमाणे उष्ण होतो.
*शिरःप्रदेश , नेत्र , नासा या प्रदेशी अत्यंत दाह असतो , नाकातून धूर निघाल्यासारखे वाटते.
*तृष्णा , भ्रम , स्वेदाधिक्य , ज्वर , मूर्च्छा यासारखी लक्षणे 
*शिरःशूल रात्री कमी होतो.

उपशम

*शीत उपचार

चिकित्सा

* दूध , इक्षुरस , कांजी , दह्याची निवळ इत्यादींच्या सहाय्याने शीत परिषेक केला जातो.

* चंदन , कमळ , पद्मकाष्ठ , शैवाळ , वंश , जेष्ठमध , मुस्ता , वाळा इ. द्रव्यांचा तुपातून शिरःप्रदेशी लेप केला जातो.

* सूतशेखर , कामदुधा , मौक्तिक , चंद्रकलारस हे कल्प उपयुक्त

# कफज शिरःशूल लक्षणे

* शिरःप्रदेश कफाने लिप्त , गुरु व स्तब्ध असतो.

* सुप्ति , तंद्रा , आलस्य , अरोचक , कर्णकण्डू , छर्दि आदि लक्षणे

* अक्षिकुट प्रदेशी शोथ

*शिरःप्रदेशातील सिरांचे स्पंदन अधिक वाढते.

* रात्री वेदना अधिक असतात

उपशय 

*स्थानिक स्वेदन

चिकित्सा

* शोधन -  नस्य , वमन , तीक्ष्ण गंडूष

* शोधनापूर्वी घृताचे अच्छपान

* शिरोविरेचनासाठी मधु , इंगुदी , मेषशृंंगी , कायफळ यांचा उपयोग करावा. याच द्रव्यांनी सिद्ध केलेली धूमवर्ती वापरावी.

* स्वेदनामध्ये पिंडस्वेदनाडीस्वेद उपयुक्त. शिग्रु , निम्ब , एरंंड आदि द्रव्यांंच्या क्वाथाने नाडीस्वेद

* विविध प्रकारचे क्षार , कोष्ठ , करंज , रोहिष आदि द्रव्यांचा सैंधव युक्त सुखोष्ण असा लेप डोक्यावर करावा.

* त्रिभुवनकीर्ति , नानगुटी इ. कल्प उपयुक्त

# सान्निपातिक शिरःशूल लक्षणे

* वात - भ्रम , कंप
  पित्त - दाह , तृष्णा
  कफ - गौरव , तंद्रा

* धूम , नस्य , लेप , स्वेद आदि उपचार

* पुराण घृत हे नस्यासाठी व पानासाठी वापरावे.

# रक्तजं शिरोरोग

* पित्तसमानलिंग
* स्पर्शासहत्वं

चिकित्सा

* पित्तज शिरःशूल प्रमाणेच करावेत

* रक्तमोक्षण करावे

*अतिशीत व अतिउष्ण उपचार टाळावेत

# क्षयज शिरःशूल 

* शिरःप्रदेशी असणारे रक्त , वसा , कफ यांच्या क्षयाने वायु प्रकोप होऊन शिरःशूल उत्पन्न होतो.

* अतिव्यवाय , शिरोभिघात इ. कारणांनी शरीरातील वसा , कफ आदि द्रव्यांचा क्षय होऊन वातप्रकोप होतो.

* यामुळे शिरोभागी तीव्र वेदना , भ्रम , मूर्च्छा , अंगसाद , शिरःशून्यता ही लक्षणे पाहावयास मिळतात.

अनुपशय

स्वेदन , वमन , धूमपान , नस्य व रक्तमोक्षण यांनी शूल वाढतो.

चिकित्सा

*ज्या धातूचा क्षय असेल त्याची चिकित्सा करावी.

# कृमिज शिरोरोग

* अत्यधिक प्रमाणात तोद

* कपालास्थींच्या मध्ये श्लेष्मल कला आदि कोणी खात आहे किंवा स्फुरण होत आहे किंवा वळवळत आहेत अशा प्रकारची भावना उत्पन्न होते.

* नाकातून पूययुक्त जलाचा स्त्राव होतो आणि तीव्र स्वरूपाचा शिरःशूल असतो.

* नाकातून येणारा स्त्राव काही वेळा सरक्त  असून दुर्गंधित येतो.

* चित्तविभ्रंश , ज्वर , कास , बलक्षय , कपाळ - तालु - मस्तक या ठिकाणी कंडू , शोथ ही लक्षणे आढळतात.

* काही वेळा नाकातून कृमी बाहेर येतात.

* अत्यंत दारूण स्वरूपाचा 

चिकित्सा

* कृमिज शिरःशूलात कृमींची उत्पत्ती झाली असेल तर नाकामध्ये रक्ताचे थेंब टाकावेत.

* तीक्ष्ण शिरोविरेचन

* शिग्रुबीज वाटून नस्य

* रक्तमोक्षण करू नये.

* तिक्त , कटु , कषाय रसांच्या क्वाथाने कवलग्रह करणे लाभदायी.

* सूक्ष्म त्रिफळा , गंधक रसायन , आरोग्यवर्धिनी इ. उपयुक्त

* भल्लातकाचा उपयोग उपयुक्त

# सूर्यावर्त

* सकाळी सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत शिरःशूलामध्ये वृध्दि व नंतर मध्यान्हापासून सायंकाळपर्यंत अपकर्ष म्हणजे र्हास अशी लक्षणे मिळतात.

चिकित्सा
*माक्याचा रस व शेळीचे दूध समप्रमाणात घेऊन नस्य
*औत्तरभक्तिक स्नेह म्हणजे आहारानंतर घृतपान करावे.
*शिरोविरेचन 
*शिरोभागी स्वेदन
*शिरोबस्ती
*रक्तमोक्षण
*वातविध्वंस ,समीरपन्नग , सूतशेखर , सर्पगंधा , जटामांसी यांचा उपयोग

अनंतवात 
*उपवास , अतिरूक्ष अतिशीत वा अत्यल्प प्रमाणात आहार घेणे यामुळे वातप्रकोप होतो.
*प्रकुपित झालेला वायु पित्त व कफ यांचाही प्रकोप करून ग्रीवा आणि मन्या यातील नाडीचा आश्रय करून त्या ठिकाणी पीडा उत्पन्न करते.
*मानेच्या मागच्या बाजूला अत्यधिक पीडा 
*नेत्र , भ्रुप्रदेश , शंखप्रदेश याठिकाणी तीव्र वेदना
*मान जखडते , हनुग्रह होतो.
*गंडप्रदेशाच्या पार्श्वभागी कंप हे लक्षण
*हा व्याधी प्रौढ किंवा वृध्दांना अधिक प्रमाणात होतो.
*कुलज इतिहास आढळतो

चिकित्सा
* गंडप्रदेशी दहनकर्म
* रक्तमोक्षण

# अर्धावभेदक

रूक्षाशनात्यध्यशनप्राग्वातावश्यायमैथुनै: ।
वेगसंधारणायासव्यायामै: कुपितोऽनिल:।।
केवल:सकफो वाऽर्धं गृहीत्वा शिरसो बली ।
मन्याभ्रूशंखकर्णाक्षिललाटार्धेऽतिवेदनाम् ।।
शस्त्रारणिनिभां कुर्यात्तीव्रां सोऽर्धावभेदक: ।
नयनं वाऽथवा श्रोतमतिवृध्दो विनाशयेत् ।
 च.सि.९/७४-७६

*हा शूल १० दिवस , १५ दिवस , वा महिन्याने पुन: पुन्हा सुरू होतो.

*तारूण्यावस्थेत किंवा बालकांत अधिक आढळून येतो.

*मानसिक चिंता , परिश्रमांची अधिकचा , भोजनातील अनियमितता , वंशपरंपरा हे कारणीभूत ठरतात.

*शिर:शूल कोणत्याही वेळी उत्पन्न होतो.

चिकित्सा

*शिरोविरेचन
*नाडीस्वेद
*अनुवसन बस्ति
*अवपीडक नस्य ( वचा , पिंपळी , मध )
*शिरोबस्ति
*अनंतमुळ , कमळ  , कोष्ठ यांचा तेल व तुपाबरोबर तयार केलेला कल्काचा डोक्यावर लेप
*गोरखमुंडीच्या रसात मिरपूड घालून तो काढा ७ दिवस घेणे.
*शंखप्रदेशी दहनकर्म
*केळे व वेलदोडा एकत्रित खाणे

# शंखक

तीव्ररुग्दाहरागं हि शोफं कुर्वन्ति दारुणम् ।
स शिरो विषवद्वेगी निरूध्याशु गलं तथा ।।च.सि.९/७१

चिकित्सा
दूध व तूप नस्य व पान
*शतावरी , काळे तीळ , जेष्ठमध , कमळ , दूर्वा , पुनर्नवा द्रव्यांचा लेप
*याच द्रव्यांचा परिषेक

Comments