स्वेदवह स्त्रोतस

दुष्टीकारणे

व्यायामादतिसंतापात् शीतोष्णक्रमसेवनात् |
स्वेदवाहीनि दुष्यन्ति क्रोधशोकभयैस्तथा || 
(च.वि.५/३०)

लक्षणे
अस्वेदनमतिस्वेदनं पारूष्यमतिश्लक्ष्णतामंगस्य परिदाह लोमहर्षं च दृष्ट्वा स्वेदवहान्यस्य स्त्रोतांसि प्रदुष्टानीति विद्यात् | ( च.वि.५/१६ )

चिकित्सा

स्वेदवहात संग असेल तर कुष्ठाप्रमाणे चिकित्सा करावी.
सर्व प्रकारच्या तिक्त रसात्मक द्रव्यांचा वापर करावा.

स्वेदाची अतिप्रवृत्ति असेल तर चंदन , कर्पुर , वचा आदि चूर्णांनी उद्वर्तन करावे.

वंगभस्म या अवस्थेत उपयुक्त

वचा तैलाने स्नेहन आणि अवगाह स्वेद उपयुक्त

उष्णतेच्या अतिरेकाने पित्तप्रकोप होऊन त्यामुळे स्वेदातिप्रवृत्ति हे लक्षण निर्माण झाले असेल तर प्रवाळ , मौक्तिक , कामदुहा , चंद्रकला उपयुक्त

Comments