निद्रानाश चिकित्सा

*सुश्रुतांनी निद्रानाशालाच वैकारिकी निद्रा म्हटले आहे.

हेतु

निद्रानाशोअनिलात् पित्तान्मनस्तापात् क्षयादपि ।
संभवत्यभिघाताच्च प्रत्यनीकैः प्रशाम्यति ।। (सु.शा.४/४२)

लक्षणे
आलस्य 
अंगगौरव 
नेत्रदाह 
अरति 
क्षुधामांद्य 
मलावष्टंभ 
शिरःशूल

चिकित्सा
*अभ्यंग ( शिरोभ्यंग , पादाभ्यंग ,कर्णपूरण )
*मूर्ध्नि तैल
*गात्र उद्वर्तन
*मर्दन
*संवाहन
*शिरोबस्ती
*शिरोभागी तक्रधारा (जटामांसी , सर्पगंधा यांनी सिद्ध )
*रूग्णास मधुर , स्निग्ध , कफकर आहार द्यावा.
*निरसे दूध किंवा म्हशीचे गार व साखर घालून दूध रात्री झोपताना द्यावे.
*आनूप व औदक प्राण्यांचे मांस व मांसरस , द्राक्षा , खडीसाखर इ. मधुर द्रव्यांचाही रात्री उपयोग करावा.
*शय्या ही मृदु , सुखकर , विस्तीर्ण व मनोज्ञ अशी हवी.
*मधुर संगीत व मनोनुकूल वातावरणामुळे झोप येते.
*जेव्हा निद्रानाश अधिक प्रमाणात असतो , रूग्णास फार बेचैनी असते , त्याच वेळी औषधांचा उपयोग करावा.

औषधी कल्प
निद्रोदय रस
शंखोदर
कर्पूरेश्वररस
अहिफेनासव
खुरासनी ओवा
जायफळ
जायपत्री
भंगा
सर्पगंधा
जटामांसी
धमासा

Comments