मूत्रवह स्त्रोतस

दुष्टीकारणे :- 

मूत्रितोदकभक्ष्यस्त्रीसेवनान्मूत्रनिग्रहात् ।
मूत्रवाहीनि दुष्यन्ति क्षीणस्याभिक्षतस्य च ।। 
(च.वि.५/२८)

*मूत्रवेगविधारण करणे
*मूत्रवेग आला असताना अन्नपान , जलपान वा मैथुन करणे
*बस्ति - उपस्थ आदि प्रदेशी आघात होणे किंवा अन्य कारणाने व्रणोत्पत्ती होणे 
*कृमी 

लक्षणे

अतिसृष्टमतिबध्दं प्रकुपितमल्पाल्पमभीक्ष्णं वा बहलं सशूलं मूत्रयन्तं दृष्ट्वा मूत्रवहान्यस्य स्त्रोतांसि प्रदुष्टानीति विद्यात् । (च.वि.५/१४)

*बहुमूत्रता वा अल्पमुत्रता असणे
*मूत्रप्रवृत्ति वारंवार किंवा अडखळत होणे
*सतत परंतु थोडी थोडी मूत्रप्रवृत्ति असणे
*सशूल - सदाह मूत्रप्रवृत्ति होणे 
*मूत्राचा वर्ण - गंध - स्वरूप यात विकृति होणे

चिकित्सा

स्वेदावगाहनाभ्यंगान् सर्पिषश्चावपीडकम् ।
मूत्रे प्रतिहते कुर्यात् त्रिविधं बस्तिकर्म च ।। (च.सु. ७/७ )

*मूत्रवह स्त्रोतसाची दुष्टी लक्षणे संग सूचित करीत असतील तर मूत्रकृच्छ्राप्रमाणे चिकित्सा करावी.
*यामध्ये वृक्क व बस्तिप्रदेशी स्नेहन , स्वेदन (तापस्वेद वा अवगाहस्वेद ), बस्ति - निरूह , अनुवासन वा उत्तरबस्ति यांचा प्रयोग केला जातो.

*औषधात गोक्षुर , पलाशपुष्प , पाषाणभेद , दगडीबोर , पुनर्नवा ही द्रव्ये विशेष उपयुक्त ठरतात.

*जेव्हा अतिप्रवृत्तिची लक्षणे दिसतात , त्यावेळी प्रमेहाप्रमाणे चिकित्सा करावी. 

*सर्व कषाय व तिक्त रसांची द्रव्ये वापरणे युक्त ठरते.

*शुद्ध शिलाजतु किंवा चंद्रप्रभा सारखे कल्प महत्त्वाचे आहे.


Comments