अजीर्ण आयुर्वेदिक चिकित्सा

मुख्य कारण - अग्निमांद्य

हेतु


*अतिप्रमाणात पाणी पिणे
*विषमाशन
*वेगविधारण
*दिवास्वाप
*रात्री जागरण
*अति गुरू , शीत , स्निग्ध , विदाही अशा आहाराचे सेवन करणे
*चिंता , शोक , भय , क्रोध , दुःख , ईर्षा आदी मानसिक कारणांनी 

सामान्य लक्षणे


*भूक न लागणे
*तोंडास चव नसणे
*उदरगौरव
*आध्मान
*मलप्रवृत्ती ग्रथित किंवा द्रवमल असणे
*छर्दि
*उदरशूल
*ग्लानि
*अंगसाद
*अंगगौरव
*भ्रम
*शिरःशूल
*सर्वांगमर्द
*अतिज्रंभा
*ज्वर
*पृष्ठ कटी ग्रह
*मूर्च्छा

आमाजीर्ण - कफ जलीय अंश वृध्दी

लक्षणे :- 

*थोडेसे खाल्ले तरी उदरगौरव निर्माण होते
*उत्क्लेश
*गंडप्रदेश व अक्षिकुट भागी शोथ निर्माण होतो.
*रूग्णास अविदग्ध (अम्लरहित)/ ज्या प्रकारचे अन्न घेतले असेल त्याचा रस , गंध असलेल्या ढेकरा अतिप्रमाणात येतात.
*त्वचा व मल यांना स्निग्धता असणे
*कंडू

चिकित्सा - लंघन

आमाजीर्णात वमनासाठी - वचाचूर्ण + सैंधव

विदग्धाजीर्ण - पित्त द्रव गुणांनी वृध्दी


लक्षणे :- 

*घशाशी आंबट , तिखट , कडवट ढेकर येणे
*पोटात आणि छातीत जळजळणे
*नेत्रदाह
*स्वेदातिप्रवृत्ती
*छर्दि
*ज्वर
*भ्रम
*तृष्णा
*मूर्च्छा

विदग्धाजीर्णाची परिणती नंतर अम्लपित्तात होत असते.

चिकित्सा - वमन - मदनफळ


विष्टब्धाजीर्ण - वात वृध्दी


लक्षणे :- 

*वायु व पुरीष यांचा अवष्टंभ होतो.
*शूल
*आध्मान
*अंगमर्द
*शिरःशूल
*कटी पृष्ठभागी वेदना
*मोह
*स्तंभ

चिकित्सा - स्वेदन
*विष्टब्धाजीर्णामध्ये स्वेदनासाठी तापस्वेद वापरावा.
*स्नेहविरेचन लाभदायी

रसशेषाजीर्ण


लक्षणे :- 
*उद्गार शुध्दि असूनही हृदगुरूता असते
*खाण्याची इच्छा होत नाही

दिनपाकी अजीर्ण

लक्षणे :- 
*एक दिवसात अन्नाचे पचन न होता ते अधिक कालांतराने म्हणजेच एक दिवसापेक्षा अधिक कालाने पचते

चिकित्सा - लंघन
चिकित्सा - उपाशीपोटी झोपावे

प्राकृत अजीर्ण

*यामुळे कोणताच विकार संभवत नाही.

उपद्रव
मूर्च्छा , प्रलाप , छर्दि , मुखप्रसेक , अंगसाद , भ्रम

अजीर्ण बरा झाल्याची लक्षणे

*शुद्ध ढेकर येणे
*उत्साह वाटणे
*मलमुत्रादींचे वेग योग्य प्रकारे येणे
*क्षुधा , तृष्णा चांगली लागणे
*शरीरात लाघवता प्राप्त होणे

चिकित्सा - 

*त्रिकटु
*पंचकोल
*कारस्कर
*भल्लातक
*विविध प्रकारचे क्षार
*लवण यांचे कल्प
*शंखवटी
*हिंग्वाष्टक चूर्ण
*लशुनादी वटी
*आमपाचक वटी
*भास्कर लवण चूर्ण
*वैश्वानर चूर्ण
*पंचकोलासव

*पथ्यापथ्य


*सुरुवातीस लंघन
*नंतर जसजसा अग्नि वर्धमान होईल त्याप्रमाणात विविध प्रकारचे यूष , लिंबू सरबत , ताक , पेया , फलरस आदि द्रवाहार द्यावा.
*गुरु , स्निग्ध व अतिप्रमाणात आहार देणे वर्ज्य करावे.
*दिवास्वाप हेही अजीर्णासाठी अपथ्यकर ठरते.



Comments